Skip to main content

Posts

Showing posts from January, 2020

तिसरे बादशाह हम !!!

तीन कलाकार, प्रत्येकाची आपली स्वतंत्र गोष्ट आणि त्यांची सांगड हे आव्हान यशस्वी पणे पेलले आहे 'तिसरे बादशाह हम' ह्या नाटकाने.  चारू ही बँकेत नोकरी करत असणारी तरुणी आणि उर्मी ही मनोरंजन विश्वात आपले स्थान पक्के करण्यासाठी खटपट करणारी तरुणी ह्या रूम-मेट्स आहेत. आपल्या दैनंदिन खर्चाचा आणि घराच्या भाड्याचा प्रश्न सोडवताना त्यात तिसऱ्या रूम-मेट ची म्हणजेच 'समर' अर्थात तिसऱ्या बादशाह ची एन्ट्री होते.  चारू आणि उर्मी ह्या दोघींच्या आयुष्यात होत असणाऱ्या अडचणींमधून समर त्यांना सहज बाहेर काढतो आणि ह्यातच दोघींनाही 'समर' बद्दल आकर्षण वाटू लागते.  पण ह्या मध्ये 'समर' चा काही वेगळाच हेतू तर नाही ना ? हे जाणून घेण्यासाठी हे नाटक बघावेच लागेल.  कलाकारांच्या कामाविषयी सांगायचे झाल्यास, खुलता कळी खुलेना मधली अभिज्ञा आणि मयुरी ची chemistry ह्या नाटकात अधिकच खुलून दिसते. सुनील बर्वे चा स्टेज अँपिअरन्स तर लाजवाब !! त्यातच त्याने सादर केलेली ऑन स्टेज गाणी म्हणजे दुग्ध शर्करा योगच.  असे हे पूर्ण मनोरंजक आणि छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप काही सांगून जाणारे नाटक आहे.