Skip to main content

Posts

पती गेले ग काठेवाडी

पती गेले ग काठेवाडी काल ठाण्यात पती गेले ग काठेवाडी हे नाटक बघितले. नाटक जुन्या काळातील आहे तर तर बहुदा आपल्याला हे नाटक आवडणार नाही अशीच भावना मनात घेऊन गेलो होतो. पण हि भावना फक्त प्रयोग सुरु होई पर्यंतच राहिली. प्रयोग सुरु झाला आणि ३ तास कसे गेले कळले सुद्धा नाही. चांगली कथा, सगळ्यांचा अप्रतिम अभिनय आणि त्याला संगीताची साथ आणि विनोदांची फोडणी म्हणजे नाटक रंगले नाही तरच नवल. अभिजीत खांडकेकर, इशा केसकर, मृण्मयी गोडबोले, ललित प्रभाकर आणि निखिल रत्नपारखी ह्यांचा रंगमंचावरचा सहज अभिनय लक्षात राहून जातो.  हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणल्याबद्दल सुनील बर्वे कलाकृती अर्थात 'सुबक' चे आभार आणि पुढील नाटकांसाठी खूप शुभेच्छा !!! आणि हो ह्या नाटकाचे फक्त २५ च प्रयोग होणार असल्याने .. आपल्या जवळच्या नाट्यगृहात लवकर हे नाटक बघून घ्या .😊😊    

ऑल दि बेस्ट २

काल ऑल दि बेस्ट २ हे नाटक दुसऱ्यांदा बघितले. पहिल्यांदा २०० वा प्रयोग बघितला होता आणि हसून हसून पुरेवाट झाली होती.  काल घरी बसून बसून कंटाळा आला होता आणि म्हटलं ठाण्यातच प्रयोग आहे तर जाऊया बघायला, त्या निमित्ताने किमान नाटकाच्या प्रयोगाचे तास तरी मजेत जातील.  नाटक नेहमी प्रमाणेच मस्त. मयुरेश, मनमीत ह्यांची पडद्यावरची धमाल पाहणे म्हणजे पर्वणी आहे. हसत हसत नाटकाची कथा उलगडत जाते आणि खुलत जाते.  अभिनय तर मस्त आहेच, पण ह्या नाटकाचे 'Energy Song' आणि त्यावरचा डान्स म्हणजे कमाल आहे.   नाटक संपल्यावर जेव्हा मयुरेश ला भेटायला गेलो तेव्हा कळलं कि त्याला प्रयोगाच्या आधीपासून १०४ ताप आहे, आणि हे संपूर्ण नाटकात कुठेही जाणवले नाही. म्हणजे संवाद, नृत्य, अभिनय अगदी नेहमीसारखे.  'Show Must Go On' हे खूपदा ऐकले होते पण काल अनुभवले.